मुंबई

टिटवाळ्यात भुयारी गटाराला भगदाड पडलेल्या खड्ड्याचे श्राद्ध

CD

कल्याण (वार्ताहर) : टिटवाळ्यातील भुयारी गटाराच्या बंदिस्त काँक्रीटीकरणाला गेल्या चार साडेचार महिन्यापासून भगदाड पडल्याने यासंदर्भात तक्रार करूनही कल्याण डोंबिवली महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. या संदर्भात अनेकदा काँक्रिटीकरणाला पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात घडले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला कंटाळून या खड्ड्याचे श्राद्ध घालत निषेध करण्यात आला. टिटवाळा महागणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बंदिस्त भुयारी असून त्यावरील काँक्रिटीकरणाला मोठे भगदाड पडल्याने याबाबत स्थानिकांनी होत असणाऱ्या गैरसोईबाबत तक्रार करूनही केडीएमसीने याकडे गेल्या दुर्लक्ष केले आहे. याबाबत आज टिटवाळ्यातील निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संदीप नाईक यांनी खड्ड्याला हार हळद-कुंकू अर्पण करीत श्राद्ध घातले.
……
ठाण्यात डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमाला
ठाणे (बातमीदार) : विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेचे आयोजन २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे ही व्याख्यानमाला सकाळी १०.३० ते १२ या वेळेत महाविद्यालय परिसरातील पाणिनी सभागृहात पार पडणार आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत २९ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर, ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, १ डिसेंबर रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, २ डिसेंबर रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे अशा तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने होणार आहे. या व्याख्यानमालेचा प्रवेश विनामूल्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.
…..
स्वछता कामगारांचे प्रशिक्षण शिबिर
अंबरनाथ (बातमीदार) : नगरपालिकेतील स्वच्छता कामगारांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराची नुकतीच सांगता झाली. स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान आणि क्षमता बांधणी अंतर्गत पालिका सभागृहात मागील आठवड्यात पार पडलेल्या या शिबिराचे उद्‌घाटन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते झाले. या शिबिरात पालिकेचे ४५० सफाई कामगार सहभागी झाले होते. औरंगाबाद येथील हारपिक वर्ल्ड टॉयलेट महाविद्यालयाचे प्रतिनिधी गणेश पाटील यांच्या वतीने कामगारांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले. उप मुख्याधिकारी उमेश राऊत, पालिकेचे स्वच्छता दूत सलिल झव्हेरी, आरोग्य अधिकारी संदीप कांबळे, शहर समन्वयक गायत्री बिऱ्हाडे, स्वछता निरीक्षक सुहास सावंत, पुंडलिक शेकटे, विनीत पाटोळे, नितीन सावंत, गणेश महाजन, पांडुरंग जाधव, आदी अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली.
…..
अंबरनाथ : प्रशिक्षण शिबिरात सहभागी स्वच्छता कामगारांना प्रमाणपत्र देण्यात आले.
…..
कल्याण पूर्वेत संविधान सोहळा
कल्याण (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोक-हित-वर्धक संघ, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन समिती व माता रमाई जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी सायं. ६.०० वा. ड प्रभाग क्षेत्र कार्यालयात संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिनानिमित्त नमन केले. तसेच २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. समाज प्रबोधनकार, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे संविधान जागर कीर्तन तसेच प्रवीण ढोणे, शिरीष पवार यांच्या सुमधुर संगीताने या सोहळ्याला मूर्त रूप प्राप्त झाले.
……

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT