मुंबई

घणसोलीचा जॉगिंग पार्क अंधारात

CD

नेरूळ, ता.२८ (बातमीदार)ः घणसोली येथील नाल्यालगत पालिकेने लाखो रुपये खर्चून जॉगिंग पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा उत्साह वाढला होता. परंतु, गेल्या महिन्याभरापासून विद्युत सेवा कोलमडल्याने हा जॉगिंग पार्क अंधाराच्या गर्तेत अडकलेला आहे. या गैरसोयीबद्दल महापालिकेकडे तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे. परंतु, आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घणसोली सेक्टर ९ येथील नाल्याच्या शेजारी पालिकेकडून वि.दा सावरकर जॉगिंग पार्कची बांधणी करण्यात आली. या ठिकाणी नवनवीन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच निसर्गाच्या सानिध्यात येणाऱ्या नागरिकांची या उद्यानाला अधिक पसंती मिळत आहे. दिवसा या ठिकाणी आल्यावर कोणतीही अडचण भासत नाही. परंतु, सायंकाळी विद्युत सेवा खंडित असल्याने पसरणाऱ्या अंधारात फिरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. या गैरसोयीमुळे सर्वाधिक परिणाम हा ज्येष्ठ नागरिकांवर झाला असून अंधारात चाचपडण्याची वेळ आल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
----------------------------------------------------
गर्दुल्ले, मद्यपींची वावर
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावलेली आहेत. त्यातच विद्युत दिवे बंद असल्याने या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. याचा फायदा गर्दुल्ले घेत आहे. तसेच व्यसन करणारे मद्यपी या ठिकाणी ताबा घेत आहेत. त्यामुळे एखादा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------------------------------------------
महापालिकेच्या जॉगिंग पार्कला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. गेल्यावर्षी येथे म्हशींमुळे लहान झाडे मृत अवस्थेत गेली होती. आता विद्युत खंडित झाल्याने जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
- संदीप गलुगडे, शहर संघटक, मनसे, नवी मुंबई
--------------------------------------------------
घणसोली येथील नाल्यालगत असलेल्या महापालिकेच्या जॉगिंग पार्कची विद्युत सेवा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. लवकरच येथील विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाईल.
- सखाराम खाडे, विद्युत अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT