विरार (बातमीदार) : वसई शेतकरी सोसायटीच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवारी (ता. ३०) दुपारी साडेचार वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित केले आहे. वसई शेतकरी सोसायटीकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आली आहे. या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी व आपल्या शेती व्यवसायात प्रगती करावी ही अपेक्षा असते. यादृष्टीने शेतकऱ्यांसाठी ‘एकात्मिक सेंद्रिय शेती व थेट विक्रीतून समृद्ध शेतकरी’ या विषयावर ज्ञानेश्वर बोडके हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे संस्थेचे चेअरमन आशय राऊत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.