विरार, ता. २८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने बेकायदा बांधकामांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. विरारमध्ये ५५ बोगस इमारतींचे प्रकरण ताजे असतानाच परिसरातील फुलपाडा येथे तब्बल नऊ बेकायदा बहुमजली इमारती बांधल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून विरार पोलिस ठाण्यात जागामालकांसह विकसकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका परिसरात एकाच परवानगीवर उभारलेल्या ५५ बोगस इमारतींचे प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर वसई परिसरातील अनेक बोगस इमारतींची प्रकरणे चव्हाट्यावर आली होती. आता विरारमधीलच फुलपाडा येथील रामचंद्र नगरमध्ये नऊ अनधिकृत बांधकाम असलेल्या बहुमजली इमारतीचे संकुल उजेडात आले आहे. या नगरात विकसकांनी नऊ बहुमजली इमारती बांधून त्यातील तब्बल ३६९ सदनिका आणि गाळ्यांची विक्री केली. याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे सहायक आयुक्त अजय चौकेकर यांच्या तक्रारीवरून विरार पोलिस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या जागेचे मालक चंद्रकांत यशवंत पाटील यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
रामचंद्र नगरमध्ये एकूण ४७ बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यातील ३० इमारती बोगस कागदपत्रे वापरून बांधण्यात आल्या असून यातील एका इमारतीवर बोगस सीसीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.