विकासाच्या नावाने मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मुंबईत विकासाच्या नावाने फक्त सगळीकडे फलक झळकत आहेत. विकासाची कामे होत नाहीत. विकासाच्या नावाने मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष राखी जाधव यांनी केला आहे. सध्या पालकमंत्री पालिकेचा कारभार चालवत आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
मुंबईत विकासाच्या नावाने फक्त सगळीकडे फलक झळकत आहेत, विकासाची कामे होत नाहीत. विकासाच्या नावाने मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. नेमकी विकास कामे झाली की नाही याची लवकरच विभागवार झाडाझडची घेतली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष जाधव यांनी दिला आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक सत्तेचा गैरवापर करीत आहेत. प्रशासनाकडून हवी ती कामे करून घेतली आहेत; मात्र लोकांच्या विकासाची कामे होत नाहीत. पुरेशा पायाभूत सुविधा मिळत नाहीत; मात्र त्या कामांसाठी वारेमाप पैसा खर्च होत आहे. रस्त्यांच्या कामाची घोषणा केली; मात्र काही झाले नाही. शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आहेच. झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची स्थिती दयनीय आहे. तलाव भरले असले, ती पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे; मात्र जी-२० च्या नावाने विकासाचे चित्र रंगवले जात आहे. मुंबईतील आभासी प्रतिमा तयार केली जात आहे. ग्राऊंड रियालिटी लवकरच विभागवार पाहणार असल्याची माहिती अध्यक्ष जाधव यांनी दिली.
............................
पालिकेवर आर्थिक संकटाची भीती
कोरोनामुळे रखडलेल्या प्रकल्पांना वेग द्यायला हवा होता; मात्र अनेक कामांसाठी सल्लागार नेमून त्यांच्या किमती वाढवत आहेत. ही बाब पालिकेच्या दृष्टीने हिताची नाही. निधीचा गैरवापर होत आहे. हे असेच सुरू राहिले तर भविष्यात पालिकेची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.