मुंबई

पारसिक चौपाटीबाधित भुमीपुत्रांची आयटीपार्ककडे झेप

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी पारसिक चौपाटी प्रकल्पासाठी आपला पिढीजात व्यवसाय गमावलेले भूमिपुत्र आगामी काळात आयटी पार्कच्या दिशेने झेप घेणार आहेत. इतकेच नव्हे, तर मनोरंजन, हॉटेल आणि पार्किंगसारख्या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो तरुण भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा होणार आहेत. गेल्या सात वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पबाधितांना ठाणे महापालिकेने २२०० चौरस मीटर, १५००, ७५० आणि २५० चौरस मीटर असे चार भूखंड पुनर्वसनासाठी देण्याचे मान्य केले आहे. त्यातूनच आधुनिकतेची कास धरत उत्पन्न आणि रोजगारनिर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे.
ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची चौपाटी उभारण्याचे काम ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेतले; मात्र हे काम हाती घेत असताना येथे पिढ्यान् पिढ्या डुबी रेती उपसा करणारे आणि त्यावर आधारित व्यवसाय करणारे भूमिपुत्र विस्थापित झाले. २०१७ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानिकांचे पुनर्वसन करणार हा शब्द देत संपूर्ण अतिक्रमण मोकळे केले. या घटनेला आता सात वर्षे झाली तरी चौपाटीबाधितांचा हा प्रश्न प्रलंबितच राहिला. आपल्या न्याय्य हक्कांसाठी मुंब्रा पारसिक रेतीबंदर फेडरेशनचा पालिका ते राज्य शासनापर्यंत लढा सुरूच राहिला. या लढ्याला अखेर आता यश आले आहे.
मुंब्रा पारसिक रेतीबंदर फेडरेशनचे अध्यक्ष आर. सी. पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रमुख सल्लागार दशरथ पाटील यांच्यासह सुकाणू समितीची मंगळवारी ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पारसिक रेतीबंदर परिसरात दोन हजार २०० चौरस मीटर, एक हजार ५०० चौरस मीटर, ७५० चौरस मीटर आणि २५० चौरस मीटर असे चार भूखंड लवकरच पालिका प्रकल्पबाधितांसाठी हस्तांतरित करणार असल्याची माहिती दशरथ पाटील यांनी दिली. या भूखंडाचा विकास करून रोजगारनिर्मिती करण्याच्या सूचना या वेळी पालिका आयुक्तांनी केल्या; मात्र त्याआधीच फेडरेशनने पुनर्विकासाचा आपला मास्टर प्लान तयार ठेवला होता. त्यानुसार या भूखंडावर यापुढे केवळ पारंपरिक व्यवसाय न करता काळाची गरज ओळखून आधुनिक व्यवसाय आणि रोजगारनिर्मिती करण्यात येणार असल्याचेही दशरथ पाटील यांनी सांगितले.

असा होणार भूखंडाचा पुनर्विकास
- २२०० चौरस मीटरचा भूखंड हा पारसिक रेतीबंदर चौपाटीच्या मधोमध आहे. तिथे आयटी पार्क उभारण्याची योजना आहे. या आयटी पार्कमध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि त्यांच्या तरुण मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहेत. यातून हजारो सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा होईल.
- ७५० चौरस मीटरचा भूखंड मुंब्य्राच्या दिशेने आहे. तेथे अवजड वाहनांसाठी पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पन्न तर मिळेलच, पण या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी हक्काचे तळही मिळणार आहे.
- कळव्याच्या दिशेने असलेल्या २५० चौरस मीटरच्या भूखंडावर उपाहारगृहाचे नियोजन आहे; तर १५०० चौरस मीटरच्या भूखंडावर मनोरंजन पार्क उभारण्यात येणार आहे.

फेडरेशन पाहणार व्यवस्था
भूखंडावर प्रकल्प उभारण्यापासून ते त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे नियोजन मुंब्रा पारसिक रेतीबंदर फेडरेशन करणार आहे. पारसिक चौपाटी बाधितांमध्ये १०५ जणांचा समावेश आहे. या १०५ बाधितांना उत्पन्नाचा हिस्सा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठ किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT