मुंबई

पाच वर्षांच्या मुलीचे अवयवदान

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : परळच्या वाडिया रुग्णालयात सोमवारी एका पाच वर्षांच्या मुलीला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर तिचे अवयवदान करण्यात आले आहेत. मुंबईतील हे ४२ वे अवयवदान असून बाल अवयवदानात हे तिसरे रुग्णालय आहे. या मृत मुलीचे हृदय, मूत्रपिंड आणि कॉर्निया दान केले गेले. विशेष बालक असलेल्या या मुलीला गेल्या आठवड्यात चेंबूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २२ नोव्हेंबर रोजी तिला वाडिया रुग्णालयात हलवण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारांदरम्यान डॉक्टरांनी २६ नोव्हेंबर रोजी तिला ब्रेन-डेड घोषित केले. त्यानंतर प्रत्यारोपण समन्वयक आणि टीमने अवयवदानाबद्दल मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. पालकांनी सुरुवातीला टाळाटाळ केली; मात्र तिच्या अवयवदानानंतर चार रुग्णांना नवीन जीवन मिळेल, या हेतूने त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

या चिमुरडीचे हृदय सोमवारी सकाळी ग्रीन कॉरिडॉरमार्गे दिल्लीतील रुग्णालयात पाठवण्यात आले; तर एक किडनी परळच्या केईएम रुग्णालयातील शेवटच्या टप्प्यातील किडनी रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आली आणि दुसरी किडनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातील रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आली.


..
तिसरे बाल देहदान
मुंबईत या वर्षातील हे तिसरे बाल देहदान ठरले. जुलैमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीच्या पालकांनी तिचे यकृत वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दान केले. फेब्रुवारी २०१९ मध्ये मुंबईत दोन वर्षांच्या मुलाचे देहदान झाले, जो आतापर्यंतचा सर्वांत लहान दाता होता. २०१९ मध्ये शहरात ७६ अवयव दानकर्ते होते, परंतु त्यानंतरच्या कोविड-१९ साथीच्या आजारामुळे घट झाली, २०२० मध्ये केवळ ३० देहांचे दान झाले आणि २०२१ मध्ये ३१ दान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठा किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'क्वाड'च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT