ठाणे, ता. २८ (बातमीदार) : महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवारी (ता. २७ ) ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस २०२३ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबरला महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन असल्याने या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. ठाणे शहर व जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या वतीने ‘सत्यशोधक विचार संवर्धन समिती, ठाणे’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने भगवती मैदान, विष्णूनगर, नौपाडा ते कॉ. गोदुताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेपर्यंत दिंडीचे आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर होत्या. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. इ. हरिदास हे प्रमुख पाहुणे होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, हरिभाऊ राठोड, जितेंद्रकुमार इंदिसे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या दोन ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार करण्यात आला. सत्यशोधक दिंडीच्या या आगळ्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी कृतिशील पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.