

Tragic Accident: Speeding Truck Claims Life of Youth in Gaganbawada
Sakal
गगनबावडा : तळकोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूरकडे बिडाचे गोळे भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने उडविल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अकिल रमजान थोडगे (वय 20 वर्षे) रा.कातळी ता.गगनबावडा असे मयत तरुणाचे नाव आहे. या अपघातात रोडवरील अन्य सहा वाहने, इमारतींना धडक दिल्याने मोठे नुकसान तर दोन गायींचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली असून सोमवारी पहाटेच्या सुमारास गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.