मुंबई

कोविड प्रतिबंधासाठी रणनीती

CD

नवी मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज
वाशी, ता. २३ (बातमीदार)ः काही राज्यांमध्ये कोविडचा जेएन -१ विषाणूने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सिंधुदुर्ग तसेच नवी मुंबई शहराला लागून असलेल्या ठाणे शहरातही रुग्ण आढळून आहेत. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
नाताळ सणामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच राज्यात कोविडच्या जेएन -१ विषाणूने बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. या विषाणूंच्या संसर्गाने सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी तसेच दीर्घकाळ कोरडा खोकला राहत असल्याने सहव्याधी (कोमॉर्बिड) असणारे रुग्ण, आजारी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांच्या सुरक्षेची गरज आहे. गर्दीच्या ठिकाणे, आजाराची लक्षणे असल्यास मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा स्थितीत खबरदारी म्हणून वाशी, नेरूळ व ऐरोली येथील महापालिकेच्या तीन रुग्णालयात व्हेंटिलेटर्ससह ६० आयसीयू बेड्स, २०० ऑक्सिजन बेड्स, कोविड आरोग्य केंद्र सुविधा आणि २०० सर्वसाधारण बेड्सची काळजी केंद्रे तात्काळ कार्यान्वित केली आहेत. त्याचप्रमाणे दैनंदिन ओपीडीमध्ये जे रुग्ण संशयित आहेत. त्याच्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
------------------------------
आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित
नवी मुंबई महापालिकेची स्वत:ची ४ हजार चाचण्या प्रतिदिन क्षमतेची आरटीपीसीआर लॅब आहे. या ठिकाणी चाचण्या अधिक सक्षमतेने करण्याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. शिवाय येथील चाचण्यांवर कोविड नियंत्रणासाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्याने बारकाईने लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
------------------------------------
कोविडचा नवीन विषाणू आढळला असला तरी नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच चुकीची माहिती प्रसारित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आजाराची लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT