मुंबई

निवासी डॉक्टरला मारहाण करणे पडले महागात

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने निवासी डॉक्टरला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तत्काळ अहवाल देण्याचे आदेश रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले होते. अहवालानुसार पालिका प्रशासनाने वरिष्ठ डॉक्टरांना ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांचा पदभार इतर वरिष्ठ डॉक्टरांकडे देण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी एक वर्षाच्या करारावर कळवा रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करतात. रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षापासून ते अनेक विभागांची जबाबदारी त्यांच्यावर असते. दरम्यान, शुक्रवारी (ता. ५) रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागात दोन निवासी डॉक्टर सेवा बजावत होते. त्या वेळी रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यावरून त्यांचा वरिष्ठ डॉक्टर संजय बर्नवाल यांच्याशी वाद झाला. यातून डॉ. बर्नवाल यांनी त्यांना शिवीगाळ करत त्यातील एका डॉक्टराला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना प्राथमिक अहवाल तत्काळ पाठवण्याचे निर्देश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉ. संजय बर्नवाल यांना ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांचा पदभार दुसऱ्या वरिष्ठ डॉक्टरांकडे देण्यात आला असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

...........................
वाद कशामुळे झाला
कळवा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक लहान मुलगी उपचारासाठी दाखल झाली होती. तिला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. यावरून रुग्णालय प्रशासनावर टीका झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी रुग्णालयात ६ ते ७ वर्षांची एक मुलगी उपचारासाठी आली होती. निवासी डॉक्टरने मुलीला सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. याबाबत तिच्या नातेवाईकांनी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यानंतर तिच्यावर रुग्णालयातच उपचार करण्याच्या सूचना वरिष्ठ डॉक्टरांनी निवासी डॉक्टरला दिल्या. यावरूनच शुक्रवारी डॉ. बर्नवाल आणि निवासी डॉक्टर यांच्यात वाद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT