मुंबई

रेल्वे पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या १२ ठिकाणी धाडी

CD

मुंबई, ता. ९ : पश्चिम रेल्वेने कनिष्ठ लिपिक आणि टायपिस्ट पदासाठी परीक्षा घेतली होती; मात्र परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याने सर्वत्र गोंधळ उडाला होता. आता पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मुंबई, सुरत, अमरेली, नवसारी आणि बक्सर शहरातील जवळपास १२ ठिकाणी छापे टाकत कागदपेत्र ताब्यात घेतली आहेत. रेल्वे भरती केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटल्याप्रकरणी पश्चिम रेल्वेने काही रेल्वे अधिकारी तसेच मुंबईतील एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी सीबीआयने काही कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी ठिकठिकाणी धाडी टाकल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयने यापूर्वीच रेल्वेच्या ८ कर्मचाऱ्यांसह खासगी कंपनीत काम करणाऱ्या सहा अशा एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच अनुषंगाने मंगळवारी सीबीआयने मुंबई, सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर येथे एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Horoscope Prediction : मार्चमध्ये 4 राशींचं नशीब फळफळणार ! शनी महाराज देणार कष्टाचं फळ

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT