पडछाया विज्ञान कथा संग्रहाचे प्रकाशन
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. २) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभागाच्या वतीने कार्यवाह भाग्यश्री नुलकर यांच्या ‘पडछाया’ या विज्ञान कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा भंडारी समाज हॉल येथे पार पडला. या सोहळ्यास डॉ. भारती निरगुडकर (माजी मराठी विभागप्रमुख, मराठी विभाग), दा. कृ. सोमण (ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पंचांगकर्ते) आणि प्रा. मेधा सोमण, अ. पां. देशपांडे (मराठी विज्ञान परिषद– कार्यवाह) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून शं. रा. पेंडसे (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभाग) हे उपस्थित होते. अ. पां. देशपांडे यांनी मराठी विज्ञान कथेचा उगम, इतिहास याबाबतचे सुंदर विवेचन केले. डॉ. भारती निरगुडकर यांनी पडछाया या कथासंग्रहातील निवडक कथांचे सुंदर असे समीक्षणवजा परिचय करून दिला. तसेच दा. कृ. सोमण यांनीदेखील निवडक कथांचे विशेष कौतुक केले. यातील कथा या मोजक्या आणि सोप्या भाषेत लिहिल्या असल्यामुळे त्या वाचनीय आहेत, असे मत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.