Accident  esakal
मुंबई

Accident: नैसर्गिक विधीसाठी सकाळी चालत होता..; कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

या धडकेत तो कंटेनरच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला | In the impact, he was crushed under the rear wheel of the container

CD

Bhivandi News: नैसर्गिक विधीसाठी पायी चालत जाणाऱ्या तरुणाला कंटेनरने जोरदार धडक दिल्याची घटना भिवंडीतील कोपर गावात घडली आहे. या अपघातात तरुणाचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहित रमेश जयस्वाल (२९) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Bhiwandi Accident News)

बुधवारी (ता. १३) सकाळी सहा वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोपर येथील वेताळ मंदिराजवळील अरिहंत कॉम्प्लेक्सच्या गेटजवळून मयत रोहित नैसर्गिक विधीला जाण्यासाठी पायी चालत निघाला होता.

त्यावेळी कंटेनर क्र. (एमएच ४६ एआर २५२५) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत चालवून रोहितला जोरात धडक दिली. या धडकेत तो कंटेनरच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला.(Accidnet News)

अतिरिक्तस्रावाने त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे.(bhiwandi Latest News)

या अपघातप्रकरणी मयत रोहितचे वडील सुरेश जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालकाच्या विरोधात नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास राऊत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT