bmc tax news sakal
मुंबई

Mumbai News: मनपाची बंपर वसुली; एकाच दिवसांत जमा केला शंभर कोटींचा कर

नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे| The municipal administration has appealed to the citizens to cooperate by paying taxes before March 31

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी मोठ्या मालमत्ताधारकांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

त्‍याचे चांगले परिणाम दिसून येत असुन त्यानुसार सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मंगळवारी १९ मार्च रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात करनिर्धारण आणि संकलन विभागाला यश आले. करदात्‍या नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

पालिकेकडून सातत्याने कर वसुलीसाठी पाठपुरावा केला जात आहे. यंदा सुधारित कर देयके फेब्रुवारीअखेरीस पाठवल्यानंतर नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून त्यांना नोटीस देणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे आदींवर पालिकेकडून भर दिला जात आहे.


करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मंगळवार, १९ मार्च रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात आली आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित ११ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

मालमत्ता कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मालमत्ताधारकांनीसुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर तसेच मालमत्ताधारकांनी आपला नियमित कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्यात आले आहेत.


एका दिवसात मालमत्ता कर वसुली-
विभाग : जमा रक्कम
ए - ५ कोटी ३९ लाख
बी - ६७ लाख ३७ हजार
सी - १ कोटी ६९ लाख
डी - ६ कोटी ९२ लाख
ई - १ कोटी ६३ लाख
एफ दक्षिण - ५३ लाख ७२ हजार
एफ उत्तर - ७९ लाख ९६ हजार
जी दक्षिण - ४ कोटी ४४ लाख
जी उत्तर - ३ कोटी ३१ लाख
एच पूर्व - ५ कोटी ७२ लाख
एच पश्चिम - ५ कोटी ९० लाख
के पूर्व - ७ कोटी ७२ लाख
के पश्चिम - ५ कोटी ७३ लाख
पी दक्षिण - २ कोटी ७८ लाख
पी उत्तर - ३ कोटी १७ लाख
आर दक्षिण - १ कोटी ७४ लाख
आर मध्य - २ कोटी ५१ लाख
आर उत्तर - १ कोटी ८६ लाख
एल - २ कोटी २१ लाख
एम पूर्व - ५८ लाख ९१ हजार
एम पश्चिम - २ कोटी ४६ हजार
एन - १ कोटी २६ लाख
एस - २९ कोटी ३ लाख ४८ हजार
टी - २ कोटी ३७ लाख ६४ हजार
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT