मुंबई

विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा

CD

पालघर, ता. २८ (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. अपयश आले तरी खचून जाऊ नका. यशासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. मेहनत केली तर यशस्वी होणारच, असे आवाहन मुंबई येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त कार्यवाह विपुला राऊत यांनी केळवे येथे केले.

केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाच्या आदर्श विद्यामंदिर शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि इर्षा या शालेय हस्तलिखिताचा प्रकाशन समारंभ बुधवारी (ता. २७) शितळा देवीच्या सभागृहात आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. शाळेतील वर्षभरात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते इर्षा या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी विश्वस्त व माजी मुख्याध्यापक हरिहर पाटील, संस्थेचे सचिव अशोक राऊत, सरपंच संदीप किणी, मुख्याध्यापिका नूतन राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष मनीषा राऊत, विनोद पाटील, राजेंद्र राऊत, अशोक राऊत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Loksabha election : ''बारामतीमधील स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही 45 मिनिटं का बंद होते?'' निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Lok Sabha Poll : खुलताबाद शहरातील काही केंद्रातील EVM बंद; मतदार वैतागले,महिलांचा त्रागा

Savaniee Ravindrra: 'मत न देताच परत यावे लागले' सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: पुण्यात ठिकठिकाणी बोगस मतदान, नागरिकांना यादीत मिळेना नाव; मुंढव्यात ईव्हीएम बंद

IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे? डोके शांत ठेवून समजून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT