crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: घणसोलीत बेकायदा राहणारे पाच बांगलादेशी जेरबंद

पाच बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील विक्रोळी युनिटने शुक्रवारी दुपारी अटक केली |Five Bangladeshi nationals were arrested by the Mumbai-based Vikhroli unit of the Anti-Terrorism Squad on Friday afternoon

CD

Navi Mumbai: घणसोली गावातील शिवाजी तलावाजवळ बेकायदा वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील विक्रोळी युनिटने शुक्रवारी दुपारी अटक केली.

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले सर्व बांगलादेशी नागरिक हे मजुरीचे काम करून मागील काही वर्षांपासून घणसोली तसेच इतर ठिकाणी राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

घणसोली गावालगत असलेल्या शिवाजी तलावाजवळ काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या विक्रोळी युनिटला मिळाली होती. माहितीच्या आधारे विक्रोळी युनिटने शुक्रवारी दुपारी घणसोली गाव येथील शिवाजी तलावाजवळ इमारत तोडण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली.

या वेळी अहात जमाल शेख (२२) व रोबुल समद शेख (४०) हे दोघे जण बिगारी काम करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले.

पोलिसांनी नाथ अपार्टमेंटजवळ इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तपासणी केली. त्या ठिकाणी बिगारी काम करत असलेल्या रॉनी सोरीफुल खान (२५), जुलु बिल्लाल शरीफ (२८) व मोहम्मद मुनीर मोहम्मद सिराज मुल्ला (४९) या तिघांकडे चौकशी केली. त्यांनीदेखील बांगलादेशी असल्याचे कबूल केले. पाचही जणांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT