mumbai local esakal
मुंबई

Mumbai Local News: उरण लोकलच्‍या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी

CD

Uran News: उरण-नेरूळ मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे.

प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी उरण रेल्वे मार्गावर रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात यावी आणि रात्री १२ वाजेपर्यंत शेवटची ट्रेन सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.()

उरण-नेरूळ-बेलापूर या रेल्वे मार्गावरून १२ जानेवारी २०२४ रोजी प्रवासी वाहतूक सुरू झाली. १२ जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यानच्या ४७ दिवसांत उरण स्थानकातून ५० हजार तिकिटांची विक्री झाली आहे. उरण स्थानकातून या दोन महिन्यांत एक लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

या ४७ दिवसांत तिकीट विक्रीतून मध्य रेल्वे प्रशासनाने १६ लाखांचा गल्ला जमा केला आहे. या व्यतिरिक्त एटीव्हीएम मशीन आणि मोबाईलवरूनही हजारो प्रवाशांनी तिकिटे काढली आहेत. उरण रेल्वे मार्गावरून दररोज तीन हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामध्ये दररोज प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे.

मात्र या रेल्वे मार्गावरून पाऊण व एक तासांनी ट्रेन सुटते. त्यामुळे सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत फक्त रेल्वेच्या २० फेऱ्यांच होतात. दिवसेंदिवस रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या वाढत चालली आहे. वाढत्या प्रवाशांमुळे आता रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

तसेच नव्याने सुरू झालेल्या उपनगरीय रेल्वे मार्गावर उरण स्थानकातून रात्रीची ९.५५ तर रात्री ९.३२ वाजता बेलापूरहून शेवटची ट्रेन सुटते. त्यानंतर उरण- नेरूळ -बेलापूर स्थानकावरून रात्रीची लोकलच नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे उरण आणि बेलापूर या दोन्ही स्थानकांतून रात्री १२ वाजेपर्यंत ट्रेनची व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

उरण-बेलापूर-नेरूळ रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे आणि या स्थानकांवरून रात्री १२ वाजेपर्यंत शेवटची लोकल सुरू करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. अद्याप तरी तसा कोणताही प्रस्ताव नाही.
- पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्‍वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT