मुंबई

शेतकऱ्यांसाठी रो-रो फेरीचे नियोजन करा

CD

विरार, ता. ४ (बातमीदार) : वसई-विरारमधील भाजी, फुले, फळे, दूध विक्रीसाठी मुंबईला फारपूर्वीपासून रेल्वेने जात आहे. परंतु, आता रेल्वेत वाढलेली गर्दी आणि दुसऱ्या बाजूला महामार्गावरील वाहतुकीची कोंडी यामुळे शेतमाल, मासे आणि दूध खराब होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वसई ते भाईंदर ही रो-रो सेवा सकाळी व सायंकाळी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अभियंता अविनाश पाटील यांना सोमवारी (ता. १) निवेदन देण्यात आले.
वसई, निर्मळ, कळंब, रानगाव, भुईगाव अर्नाळा आणि परिसरातील पश्चिम पट्ट्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणात फळे, मासे आणि भाजीपाला विक्रीस जात असतो. हा शेतमाल मुंबईत नेण्यासाठी येथील शेतकऱ्यांना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे, नंतर रेल्वे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र, रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटे व सायंकाळच्या वेळेत अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यात त्यांचे श्रम आणि पैसा वाया जातो. अशा वेळी महाराष्ट्र सागरी मंडळाने सुरू केलेल्या रो-रो सेवेची नियोजित फेरी सकाळी व सायंकाळी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी विनंती देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांना फायदा होणार
वसई-भाईंदरदरम्यान २० फेब्रुवारीपासून रो-रो सेवा सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यात सुरू झालेली ही पहिली रो-रो सेवा आहे. या सेवेमुळे दोन्ही ठिकाणांचा प्रवास अगदी १५ ते २० मिनिटांत शक्य झाला आहे. तसेच दोन्ही शहरांतील अंतर ३४.७ किमीने कमी झाले आहे. ही सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. मात्र, या सेवेचा अधिक फायदा शेतकऱ्यांना होऊ शकणार असल्याने या सेवेची नियोजित फेरी सकाळी व सायंकाळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT