crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Navi Mumbai: कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय; वाचा महत्वाची बातमी

कोणालाही अशा प्रलोभनाचे मेसेज किंवा फोन आल्यास त्वरित पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आवाहन नरेंद्र पाटील |Narendra Patil appeals to anyone who receives such tempting messages or calls to immediately report to the police

CD

Vashi News: गेल्या काही दिवसांपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने २४ तासांत कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली गरजूंची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून दिली.

त्याचसोबत कोणालाही अशा प्रलोभनाचे मेसेज किंवा फोन आल्यास त्वरित पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आवाहन नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे गरजू आणि दुर्बल नागरिकांना उद्योग उभारणीसाठी मंडळाच्या माध्यमातून विविध योजनेंतर्गत बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. या कर्जावर मंडळाच्या माध्यमातून व्याजपुरवठा केला जातो.

गरजू नागरिकांना सहकार्य करता यावे याकरिता सर्व योजना ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून मंडळाची कार्यालये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मंडळाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याचे मंडळातील सभासदांच्या निदर्शनास आले आहे.

नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांनी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा फोटो फेसबुक व व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमांच्या डीपी, स्टेटसला ठेऊन हे अकाऊंट मंडळाचे अधिकृत अकाऊंट असल्याचा भास निर्माण केला आहे.

या अकाऊंटच्या माध्यमाद्वारे अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या वतीने २४ तासांत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्‍वासन या टोळीमार्फत देण्यात येत आहे. प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. अशा प्रकारचे फसवणुकीचे काही प्रकार निदर्शनास आले आहेत.


मंडळाच्या वतीने २४ तासांत कर्ज देण्याचे खोटे प्रलोभन फसवणूक करणाऱ्यांकडून दाखवले जात आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी सावध राहा. व्हॉट्सॲप किंवा फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पोस्ट दिसल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करा.
- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT