मुंबई

विक्रोळीत दूषित पाणीपुरवठा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : विक्रोळी येथील कन्‍नमवार नगरमध्‍ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. या भागातील जलवाहिनीचे म्हाडाकडून प्रचलन व परिरक्षण केले जात असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने ५०० घरांमधील दोन हजार ६५८ नागरिकांचे आरोग्‍य सर्वेक्षण केले आहे.
कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक १४ व आजूबाजूचा परिसर हा ‘म्हाडा’अंतर्गत येतो. त्या ठिकाणी अस्तित्त्वात असलेल्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीमधून म्हाडा प्राधिकरणाच्या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर परिसरात म्हाडा क्षेत्रात असलेल्या स्वतंत्र इमारतींना ‘म्हाडा’ प्राधिकरणाद्वारे पाणीवितरण व्यवस्थेतून पुरवठा केला जातो. त्यामुळे जलवाहिनीचे जाळे ‘म्‍हाडा’च्या मालकीचे असल्‍याने त्याचे प्रचलन व परिरक्षण केले जाते; पण खबरदारी म्हणून महापालिकेने दूषित पाणी गळतीच्या नेमक्या ठिकाणाचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी अत्याधुनिक क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे.
-----------------------------------------
तिघानांच पाण्याची बाधा
कन्नमवार नगर आरोग्य केंद्रातील सहायक वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांमार्फत कन्नमवार नगरमधील इमारत क्रमांक ६, ७, ८, १२, १८ मधील दोन हजार ६५८ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी तिघांना मळमळ आणि उलटी झाली आहे. तसेच महापालिका रुग्णालय किंवा खासगी दवाखान्यामध्‍ये जलजन्य संसर्ग रुग्णांची वाढ झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-------------------------------------------
नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी
दूषित पाणीपुरवठा होत असलेल्‍या इमारतीतील पाण्याचे नमुने घेण्‍यात आले असून पालिकेच्‍या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्‍यात आले आहेत. त्यावर प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच कन्नमवार नगर येथील स्थानिकांच्या आरोग्याकडे सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे.
--------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT