Sunil tatkare
Sunil tatkare sakal
मुंबई

Lok Sabha Election 2024 : सुनील तटकरे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील; आमदार गोगावले यांचा विश्‍वास

सकाळ वृत्तसेवा

माणगाव, ता. १० (वार्ताहर) : रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट), आरपीआय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास शिवसेना उपनेते तथा विधी मंडळ पक्षप्रतोद माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी माणगाव येथे बोलताना व्यक्त केला. ( raigad lok sabha election 2024)

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट), भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रचार कार्यालय माणगावमधील जुने बसस्थानक येथे सुरू करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते व मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी बोलताना आमदार भरत गोगावले म्हणाले की, येणाऱ्या ७ मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार असून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचे प्रचार कार्यालय ठिकठिकाणी सुरू होणार असून पहिले प्रचार कार्यालय मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात सुरू होत आहे. चार पक्षांचे हे कार्यालय असून या ठिकाणाहून बैठका, सभा, प्रचार रॅली यांचे नियोजन कार्यकर्त्यांना करण्यात येईल. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने कार्यालयात येऊन प्रचाराचे नियोजन करावे.

आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करणे हेच आपले उद्दिष्ट आहे. यासाठी सर्वांनी एकदिलाने हातात हात घालून काम करूया. येत्या १८ एप्रिल रोजी अलिबागमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यावेळी जास्तीतजास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. ही निवडणूक महत्त्वाची असून कोणीही गाफील राहू नका, असा सल्लाही यावेळी गोगावले यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला. मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी उपस्थित सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना गुढीपाडव्याच्या व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन प्रचार कार्यालयाच्या उद्‍घाटनाला असलेल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष केकाणे, दक्षिण रायगड शिवसेना संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, भाजपचे ज्‍येष्ठ नेते संजय आप्पा ढवळे, प्रदेश भाजप महिला मोर्चा सचिव यशोधरा गोडबोले, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख महेंद्र मानकर, माजी सभापती संगीता बक्कम, माजी सभापती प्रकाश लाड, माजी उपसभापती तुकाराम सुतार, भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष नीलेश थोरे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप- शिंदे गटातील पदाधिकारी नाराज

प्रचार कार्यालयाच्या उद्‍घाटनाला माणगाव येथील शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, भाजपचे उपनगराध्यक्ष राजेश मेहता, शहराध्यक्ष नितीन दसवते, तसेच शिंदे गटाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका अनुपस्थित राहिल्याने नाराज असल्‍याची चर्चा होती. यावेळी शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत आम्हाला निमंत्रण दिले जात नसल्याचे सांगितले. तसेच नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, शिंदे गटाचे नगरसेवक, नगरसेविका व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही आम्हाला डावलले जात असल्याचे सांगून आम्हाला साधा फोनही केला जात नाही. केवळ व्‍हॉट्सॲपवर माहिती पाठविली जाते, असे सांगून नाराजी व्‍यक्‍त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT