मुंबई

Thane News: ठाण्याच्या बाजारात पिवळा कलिंगड दाखल; मिळतोय संमिश्र प्रतिसाद

ग्राहकांचा पिवळ्या कलिंगडाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे |Yellow Kalingada is getting mixed response from consumers

CD

Thane News: उन्हाळा सुरू झाल्यावर रसाळ कलिंगडांना मागणी वाढते; परंतु बाजारात लालऐवजी पिवळी कलिंगडे दाखल झाली आहेत.

ही पिवळी कलिंगडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही कलिंगडे चवीला गोड व आरोग्यासाठी चांगली असल्याचे विक्रेते सांगतात. तसेच ग्राहकांचा पिवळ्या कलिंगडाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

सध्या उन्हाळा तीव्रतेने वाढत आहे. तापमान वाढीमुळे शरीराला थंडावा मिळावा, यासाठी शीतपेये तसेच फळांना मागणी वाढत आहे.

यात थंडगार कलिंगडाला सर्वाधिक मागणी असते. सध्या बाजारात कलिंगडाला मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात आवकही वाढली आहे. कलिंगड विकत घेताना ग्राहक आतून कलिंगड लाल आहे ना, याची खात्री करून मगच खरेदी करतात; मात्र आता बाजारात आतून पिवळी असणारी कलिंगडेही दाखल झाली आहेत.

सोलापूरहून ही कलिंगडे ठाण्यातील मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहेत; मात्र या पिवळ्या कलिंगडाला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याची चव गोडच असल्याची माहिती विक्रेते हरी जयस्वाल यांनी दिली; मात्र हे आरोग्यासाठी कसे आहेत, याबाबत ग्राहकांमध्ये शंका असल्याने याच्या खरेदीला संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे.

सध्या कलिंगडाची ३० रुपये किलोने विक्री होत असून १०० रुपयांना प्रतिनग मिळत आहे; तर आतून पिवळ्या दिसणाऱ्या अशा कलिंगडची किंमत ५० ते ६० रुपये किलो आहे; तर एका कलिंगडाची किंमत १५० ते २०० रुपये असल्याची माहिती पाचपाखाडी येथील फळविक्रेते हरी जयस्वाल यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Case: सुप्रीम कोर्टानेही मानलं शिवसेना ठाकरेंची? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून नेमकं काय समोर आलं? ते 11 मुद्दे काय?

Real Estate Revenue: बांधकाम क्षेत्राला अच्छे दिन! चार महिन्यांत मुद्रांक विभागाचा महसूल २१,९२८ कोटींवर; १७ टक्क्यांनी वाढ

Koyna Dam Water Level : कोयना धरणातील पाणीसाठा चार दिवसांपासून 92 टीएमसीवर स्थिर; महाबळेश्वर, नवजा, कोयनानगरमध्ये किती पाऊस?

Marathi News Live Updates : पुण्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, कोकणासाठी आज यलो अलर्ट जारी

Tukaram Mundhe: अ‍ॅनालॉग पनीर बंदीवर तुकाराम मुंढेंचे स्पष्टीकरण, सावजीबाबत माफीचा प्रश्नच नाही

SCROLL FOR NEXT