crime news mumbai  Sakal
मुंबई

Crime News: दुकानांच्या तोडफोडप्रकरणी २५ ते ३० जणांवर गुन्हा

एक मोठ्या जमावाने तीन ते चार दुकानांची तोडफोड केली होती|A large mob vandalized three to four shops

CD

Mira Bhaindar Crime: भाईंदर पूर्व भागातील चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जमावाने दुकानांची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी २५ ते ३० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

एका चिकन शॉप चालकाने शेजारीच राहणाऱ्या चार वर्षीय मुलीवर अत्याचार केले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर एक मोठ्या जमावाने तीन ते चार दुकानांची तोडफोड केली होती. हा जमाव नवघर पोलिस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजीदेखील केली.

त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे सांगूनही जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जाऊन नये यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले होते.

त्यानंतर तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीसी टीव्हीच्या मदतीने या सर्व आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उत्तरेत थंडीची लाट तर दक्षिणेत पावसाचा कहर; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

Satara News: सातारा जिल्ह्यातील ‘जयवंत शुगर’, ‘ग्रीन पॉवर’ला ३८ लाखांचा दंड; साखर आयुक्तांचे आदेश, नेमकं काय कारण?

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

SCROLL FOR NEXT