thane crime
thane crime sakal
मुंबई

Thane News: दवाखान्यात पत्नी अचानक पडली आजारी, संतापलेल्या पतीने घेतला डॉक्टरांना चावा

सकाळ वृत्तसेवा


डोंबिवली, ता. २३ : महिला रुग्णाच्या नातेवाइकांनी डोंबिवलीतील एका रुग्णालयात डॉक्टरांसह तीन जणांना शिवीगाळ, मारहाण करत चावा घेतल्याची घटना घडली आहे. जखमींवर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तसेच जखमींच्या वैद्यकीय अहवालाप्रमाणे मानपाडा पोलिस ठाण्यात महिला रुग्णाचे पती राज सिंग व व तिची सासू सुशिला सिंग यांच्याविरोधात शनिवारी (ता. २०) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयात शुक्रवारी (ता. १९) डॉ. नितीन खोटे हे कर्तव्यावर होते. रात्रीच्या वेळी ज्योती सिंग यांच्या पोटात दुखत असल्याने त्या रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या.

यावेळी त्यांच्यासोबत सुशिला सिंग होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन डॉ. खोटे यांनी ज्योती यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. उपचारानंतर ज्योती यांना घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी पुन्हा ज्योती यांचे पोट दुखू लागले, डॉ. खोटे यांनी उपचार सुरू केले. दरम्यान, ज्योती यांचे पती राज हे रुग्णालयात आले व त्यांनी डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली.

डॉक्टरांनी सीटीस्कॅन करण्यास सांगितले, तसेच त्यानंतर निदान होईल, त्याप्रमाणे उपचार करू, असे सांगताच राज संतापले. यामुळे रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. राज यांनी डॉ. खोटे यांच्या हाताला चावा घेतला.

त्यांच्या बचावासाठी आलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांनादेखील राज यांनी चावा घेत जखमी केले. तर सुशिला यांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. राज व सुशिला यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली म्हणून डॉ. खोटे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT