Thane  nale safai
Thane nale safai sakal

Thane News: पालिका उभारणार नालेसफाईसाठी यंत्रणा; मुदतवाढ देऊनही निविदेकडे कंत्राटदारांकडून पाठ

क्षेत्रातील वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर परिसर वगळता इतर भागातील नालेसफाईच्या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्याचे समोर आ

Thane Municial Corporation: पावसाळ्याच्या काळात नाले, गटारे तुंबून पाणी साचून जनजीवन विस्कळित होऊ नये, यासाठी दर वर्षी कोट्यवधीचा निधी खर्च करून नालेसफाई करण्यात येते. त्यातच यंदा वेळेत नालेसफाई पूर्ण व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने मार्च महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली.

मात्र, एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला, तरी निविदेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत नाही. पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार पुढे येत नसल्यामुळे पालिकेने आता नालेसफाईची कामे स्वतःच्या यंत्रणेमार्फत करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.(maharshtra news)

Thane  nale safai
Ulhasnagar Municipal Corporation : धक्कादायक ! पिण्याच्या पाण्यात नालीचे पाणी ; नागरिकांची महानगरपालिकेत धाव

ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभागांमध्ये ११९ किलोमीटर लांबीचे एकूण ३०६ नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई ठाणे पालिका कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राटदारामार्फत करते. नालेसफाई प्रभावी व्हावी, यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रकिया राबवली जाते.

यंदा यामध्ये जीएसटीचा भार कमी केल्याचे दाखवून नालेसफाईचा निधी सात कोटींवर आणला गेला आहे. त्यात वेळेत नालेसफाई व्हावी, यासाठी यंदाच्या वर्षी महिनाभर आधीच निविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यानुसार पालिकेकडून निविदा प्रक्रियादेखील राबविली होती. त्यानुसार क्षेत्रातील वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर परिसर वगळता इतर भागातील नालेसफाईच्या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्याचे समोर आले.thane news

Thane  nale safai
Nagpur Municipal Corporation : वृक्षतोडीबाबत वेबसाइटवर रीतसर माहिती द्या ; तपशील सार्वजनिक करण्याच्या केल्या सूचना

तसेच पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्याने एप्रिलचा मुहूर्त हुकल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिकेने आता निविदेतील काही अटी व शर्तींमध्ये काही बदल करून निविदांना १८ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली. वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर परिसर वगळून या निविदा काढण्यात आल्या होत्या.(mumbai news)

दरम्यान, वर्तकनगर परिसर वगळता इतर भागातील निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद दिलेला नसून पालिकेने आता पुन्हा २२ एप्रिलपर्यंत निविदांना मुदतवाढ दिली आहे. सातत्याने निविदा काढूनही कंत्राटदार त्याकडे पाठ फिरवित असल्याने पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला असून यामुळे शहरातील नालेसफाईची कामे लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलपर्यंत निविदांना प्रतिसाद मिळाला नाही, तर स्वत:च्या यंत्रणेमार्फत नालेसफाईची कामे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

Thane  nale safai
Pune Municipal Corporation : पुणे महापालिका मालामाल ; तिजोरीत सात हजार ४६३ कोटी रुपयांची भर

पालिका क्षेत्रातील नाल्यांची आकडेवारी

ठाणे महापलिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक २०१ नाले असून त्याखालोखाल दिव्यात १३१, नौपाडा प्रभाग समितीत ४९, वागळे इस्टेटमध्ये ३८, लोकमान्य-सावरकरमध्ये ३४, उथळसरमध्ये ३४, वर्तकनगरात २९, माजिवडा- मानपाडा ४४, मुंब्य्रात ८० नाले असल्याची नोंद आहे.(important location in thane)

Thane  nale safai
Pune Municipal Corporation : पुणे महापालिका मालामाल ; तिजोरीत सात हजार ४६३ कोटी रुपयांची भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com