मुंबई

सानपाडा भुयारी मार्गात वाहतूक कोंडी

CD

तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : सिडकोने नियोजन करून वसवलेल्या सानपाडा नोडमध्ये गरजेनुसार सोयी-सुविधा विकसित न केल्याने हा नोड वाहतूक कोंडीत अडकला आहे. हार्बर रेल्वे मार्गाच्या पश्‍चिमेकडे वसलेल्या नोडमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग आहे. पर्यायी मार्ग नसल्याने सानपाड्यातील रहिवाशांना रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सानपाडा रेल्वे स्थानकापासून पूर्व-पश्‍चिम असा प्रवास करण्यासाठी एकच भुयारी मार्ग हा पर्याय आहे. त्यामुळे कायम या मार्गावर वाहनांची कोंडी होत असल्याचे वाहनचालकांना सकाळ आणि संध्याकाळी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाढती लोकसंख्या व त्यासोबत वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे सानपाडा येथील भुयारी मार्ग अपुरा पडत असल्याचे दिसून येत आहे. नियमित हजारो वाहने या भुयारी मार्गाचा वापर करीत असतात; परंतु नियमित सकाळी व सायंकाळी अपुऱ्या भुयारी मार्गामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्यामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात आहे. अनेकदा रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्रवासी वाहनचालक व नागरिकांमध्ये वाद निर्माण होत असतात. यावर कायस्वरूपी तोडगा म्हणून भुयारी मार्ग किंवा पर्यायी उड्डाणपूल उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT