मुंबई

कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

CD

कामोठे, ता. २५ (बातमीदार) : कामोठे शहरातील सेक्टर १७ व २१ परिसरातील इमारतींना सिडकोकडून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येथील सदनिकाधारकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
कामोठे नोडची लोकसंख्या तीन लाखांच्या आसपास आहे. येथील नागरिकांना प्रतिदिन ४२ एमएलडी पाण्याची गरज आहे. सिडको कामोठे नोडसाठी एनएमएमसीकडून प्रतिदिन सुमारे ३५ व एमआयडीसीकडून २ एमएलडी पाणी विकत घेते. उन्हाळ्यात नवी मुंबईत पाण्याची मागणी वाढल्यानंतर, जलवाहिनी दुरुस्तीचे काम निघाल्यावर कामोठेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. शहराच्या टोकाला असलेल्या इमारतींना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे बुस्टर पंपाचा वापर केला जात आहे. सध्या सेक्टर १७ व २१ परिसरातील इमारतींना कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिक टँकरद्वारे पाणी विकत घेऊन दैनंदिन कामकाज उरकत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
--------
कामोठे नोडला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या एका टोकाला असलेल्या सेक्टर १७ व २१ मधील काही इमारतींना सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशा इमारतींना गरजेनुसार व मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.
- प्रशांत चहारे, पाणीपुरवठा अधिकारी, सिडको
-----------
कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. सिडको व पनवेल महापालिकेने नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
- अजित जाधव, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT