मुंबई

राजा शिवछत्रपती परिवाराकडून सांकशी किल्ल्याची स्वच्छता मोहीम

CD

राजा शिवछत्रपती परिवाराकडून सांकशी किल्ल्याची स्वच्छता मोहीम
पेण, ता. २९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांच्या किल्ल्यांची स्वच्छता मोहीम मुंबई येथील राजा शिवछत्रपती परिवाराकडून राबविण्यात येत आहे. त्‍यानुसार पेण येथील सांकशी किल्ल्यावर ही स्‍वच्‍छता मोहीम राबविण्यात आली, पेण तालुक्यातील मुंगोशी गावाच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुरातन सांकशी किल्ल्याच्या स्वच्छ्ता मोहिमेसाठी २३ मावळ्यांसह दोन महिलांनी सहभाग घेऊन किल्ल्याची पूर्णतः साफसफाई केली. यावेळी पुरातन असणाऱ्या वस्तू एका ठिकाणी जमा करून ठेवण्यात आल्‍या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करून इतिहास जागरूक ठेवण्याचे काम राजा शिवछत्रपती परिवाराकडून करण्यात येत असल्‍याने त्‍यांचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी दुर्गरक्षक कैलास घरत, यतिश करण, ज्ञानेश्वर इंगोले, राकेश पयेर, विजय मोरे, प्रसाद आंबवले यासह महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhas River: धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली इशारा पातळी; कल्याण-डोंबिवलीकरांवर पुराचे संकट, प्रशासनचा हाय अलर्ट

Driving Licence Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नियम बदलणार; बाईक, टॅक्सीसाठी १ ऑगस्टपासून अंमलबजावणीची शक्यता

Latest Marathi News Live Update : खेडमध्ये जगबुडी नदीला पुन्हा पूर

Gold Rate Today: सलग 5व्या दिवशी सोनं स्वस्त! 18 कॅरेट 1.08 लाखांवर; 22k आणि 24k सोनं किती रुपयांना?

Mumbai Heavy Rain : पावसााचा फटका! सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; नेरळ-भिवपुरी रेल्वे रुळांवर पाणी, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT