मुंबई

विजेच्या खेळखंडोब्याने नागरिक त्रस्त

CD

वसई (बातमीदार) : तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत, अशातच वसई-विरार शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रुग्ण, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक त्रासले आहेत. इस्पितळ, संस्थांमध्येदेखील वीज खंडित होत असल्याने त्याचा फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे प्रवाशांना उन्हाचे चटके सहन होत नाहीत. त्यांना अंगावर पुरळ येणे, चक्कर येणे, हाताला चटके बसणे अशा प्रसंगातून जावे लागत आहे. त्यातच गृहिणी, घरून काम करणारे नागरिक, व्यावसायिक वर्ग आदींना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उष्णतेची झळ अधिक जाणवू लागली आहे. विजेचा वापर अधिक होऊ लागल्याने विजेवर येणारा भार वाढला आहे, तसेच पावसाळी कामे महावितरण विभागाकडून सुरू असल्याने वीज खंडित केली जात आहे. मात्र, उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Pune News: गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली; परवानगी प्रक्रियेतील अडथळे दूर, घरगुती पीएनजी वापराला मिळणार गती

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

SCROLL FOR NEXT