मुंबई

वाशीत डिजिटल व्यवसाय प्रणालीवर कार्यशाळा

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : वाशी सेक्टर तीनमधील महात्मा जोतिबा फुले भवनमध्ये ७ मे रोजी दुपारी तीन वाजता आधुनिक डिजिटल व्यवसाय प्रणालीवर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडणार आहे. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून आयटी टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट दीपा राऊत उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी डिजिटल कार्यप्रणालीचा वापर, व्यवसाय ऑटोमेशन, अर्थसाह्य आणि सरकारी योजना, डिजिटल मार्केटिंग, व्यवसायासाठी ब्रँडिंगचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, तसेच नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या समन्वयक वृषाली मगदूम व अमरजा चव्हाण उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत प्रवेश विनामूल्य असून अधिक माहितीसाठी ९९८७७६०७८५, ८८७९७७४३४८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT