मुंबई

मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली

CD

मुंबई, ता.१ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.१) मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने झालेल्या या रॅलीला विविध वयोगटातील ४५० पेक्षा अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. मुंबईतील वांद्रे म्हाडा कार्यालयापासून प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, वांद्रे ते अंधेरी क्रीडा संकुल, वांद्रे ते एनसीपीए नरिमन पॉइंट आणि वांद्रे ते कालिदास सभागृह, मुलुंड अशा चार मार्गांवर ही रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान विविध ठिकाणी मतदान करण्याचा संदेश दिला गेला. सहा वर्षांच्या सायकलस्वारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा तसेच व्यावसायिकांचा उत्साहपूर्ण सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MGNREGA Repeal : मनरेगा लवकरच बंद होणार, नवी योजना आणली जाणार; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

Video : स्वस्तातला शर्ट, पायात स्लीपर अन बिकट अवस्था ! कॉमेडी शोचा विनर सुनील पालची अवस्थेने नेटिझन्स अस्वस्थ

Latest Marathi News Live Update : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलं

Shaktipeeth highway:'शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको'; सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा..

Lionel Messi In India : लिओनेल मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार नाही; समोर आलं मोठं कारण...

SCROLL FOR NEXT