मुंबई

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

CD

कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या तथापि इतर ठिकाणी मतदार असलेल्या ५६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे लोकशाहीचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या टपाली मतदान प्रक्रियेची समक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नेतीवली नाका येथील एसएसटी पथकाची पाहणी करून संबंधित पथकाला योग्य ते निर्देश दिले.
कल्याण लोकसभा मतदारसंघात नुकतेची टपाली मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर व वैशाली परदेशी यांच्यासह निवडणूक कर्तव्यावरील आणि मतदारसंघाच्या परिक्षेत्राबाहेरील ५६४ अधिकारी, कर्मचारी वर्गाने टपाली मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कल्याण लोकसभा मतदारसंघ परिक्षेत्राबाहेरील निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा १७ आणि १८ मे रोजीही उपलब्ध राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel: पनवेलमधील व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर; अंगणवाडी सेविकेने नव्हे तर आईनेच मुलीला मारहाण केल्याचे स्पष्ट

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Jain Community : मालाडमधील 'त्या' वादग्रस्त प्रकरणावर अखेर पडदा! जैन समाजाचे शिष्टमंडळ 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंना सुपूर्द केला लेखी माफीनामा

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

Pune: रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; सहा फलाटांच्या कामाला सुरुवात ; नवीन ६० गाड्या धावणार

SCROLL FOR NEXT