मुंबई

बदलापुरात वादळ वाऱ्यासह गारपीट

CD

बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बदलापूर शहराला बसला असून सोमवारी (ता. १३) दुपारपासून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. दुपारी १२ वाजल्यापासून आभाळ भरून आले. पाऊस कोसळण्यापूर्वी १०६.६ किमी ताशी वेगाने वारे वाहत होते. दुपारी तीन वाजता बदलापुरात सुरू झालेल्या पावसात आधी मोठमोठ्या गारा पडल्या. साधारण ५० मीमी पेक्षाही जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सूनला लवकर सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. सोमवारी दुपारी बारापासूनच वातावरणात कमालीचा बदल जाणवू लागला. त्यानंतर हळूहळू ढग जमा होऊन आभाळ भरून आले. यावेळी जोरदार सोसाट्याच्या वाऱ्याने बदलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. साधारण एक ते दीड तास सुरू असलेल्या या वाऱ्याचा वेग ताशी १०६.६ असल्याची नोंद झाल्याचे हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले.

रेल्वे सेवा विस्कळित!
अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने बदलापुरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. यावेळी बदलापूर रेल्वेस्थानक परिसरात ओव्हरहेड वायरवर झाडाची भलीमोठी फांदी कोसळली. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने साधारण अर्धा तास रेल्वे सेवा विस्कळित झाली होती. अखेर परिश्रम घेऊन ही फांदी बाजूला करण्यात आली. अर्ध्या तासाने पुन्हा रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

सहा ठिकाणी झाडांची पडझड
बदलापूर पूर्व परिसरात गोळे वाडी, पाण्याची टाकी शिरगाव परिसर, पश्चिमेला एरंजाड, बदलापूर गाव, मांजर्ली, हेंद्रेपाडा या सहा ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. कोसळलेली झाडे बाजूला करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्याने हे काम करण्यास वेळ लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT