मुंबई

रस्त्यांच्या स्थितीवरून मुख्यमंत्र्यांची नाराजी

CD

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामाच्या प्रगतीवरून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नापसंती व्यक्त केली आहे. पावसाळ्याआधी रस्त्यांची कामे पूर्ण होणार नसल्याने किमान गणेशोत्सवापूर्वी शहरातील काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झालीच पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.
महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी रविवारी आयोजित केलेल्या बाईक रॅलीत मुख्यमंत्री सहभागी झाले होते. मिरा-भाईंदरमधील ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रात ही रॅली काढली होती. या वेळी काँक्रीट रस्त्यांसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले होते. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मुख्यमंत्र्याच्या लक्षात आले. पावसाळा जवळ आला असतानाही रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

आयुक्तांना सूचना
मुख्यमंत्र्यांनी या वेळी थेट आयुक्त संजय काटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या वारंवार सूचना दिल्यानंतरही महापालिकेने त्याची अंमलबजावणी केली नसल्याबद्दल आयुक्तांकडे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात रस्त्यांची कामे बंद होतील. मात्र, पावसाचा जोर कमी होताच कामाला वेग द्यावा. आगामी गणेशोत्सवापर्यंत शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT