मुंबई

वनविभागाची जमीन विकण्याच्या बहाण्याने फसवणूक

CD

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : सीबीआयचा अधिकारी असल्‍याचे भासवून एकाने कोल्हापूरमधील एका ठेकेदाराला व त्याच्या मित्राला वनविभागाची पडीक ५०० एकर जमीन विकण्याच्या बहाण्याने तब्बल ८० लाखांची फसवणूक केली. सुनील हनुमंत धुमाळ (४८) असे तोतया अधिकाऱ्याचे नाव असून वन विभागाचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तसेच दिंडोशी न्यायालयाची बनावट ऑर्डर देऊन त्‍याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. वेगवेगळ्या बहाण्याने धुमाळने अनेक लोकांची फसवणूक केली असून सीबीडी पोलिसांकडून त्‍याचा शोध घेण्यात येत आहे.
प्रसाद घोरपडे सीबीडीतील एका कार्यालयात कामाला असून तीन वर्षांपूर्वी त्यांची सुनील धुमाळ याच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी धुमाळने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले होते. तो सीबीआयची लाल दिव्याची गाडी घेऊन भेटीला येत असल्याने घोरपडेंचा त्‍याच्यावर विश्वास बसला होता. दरम्यान त्याने भारत सरकारच्या उच्चपदस्थ समितीवर अधिकारी असल्याचे सांगून ७० ते ८० लाखांत वनविभागाची पडीक जमीन नावावर करून देण्याचा बहाणा केला.
त्याच्यावर विश्वास ठेवून घोरपडे व त्यांचा मित्र प्रसाद जैन या दोघांनी कोल्हापूर आजरा येथील ५०० एकर वनजमीन नावावर करून घेण्यासाठी धुमाळला रोख व ऑनलाईन असे टप्प्याने ८० लाख रुपये दिले. त्यानंतर धुमाळने भारत सरकारच्या वन विभागाचे जमीन हस्तांतराचे ना हरकत पत्र व सिटी सिव्हिल दिंडोशी न्यायालयाचे आदेशपत्रही दिले. मात्र जमीन हस्तांतराचा अंतिम आदेश देण्यास त्‍याने टाळाटाळ सुरू केली. घोरपडे यांनी, धुमाळने दिलेल्या वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्राची तसेच कोर्टाच्या आदेशाची खातरजमा केली असता दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. याप्रकरणी सीबीआयच्या कार्यालयात चौकशी केली असता, तो सीबीआयमध्ये कंत्राटी चालक म्हणून काम करत असल्याचे व त्याने बनवलेले सीबीआयचे ओळखपत्र बनावट असल्याचे आढळले.
फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच, घोरपडे यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात धाव घेत घोरपडेविरोधात तक्रार दाखल केली. त्‍यानुसार फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

लाल दिव्याच्या गाडीचा वापर
सुनील धुमाळ हा सीबीआयच्या कार्यालयात कंत्राटी चालक म्हणून काम करतो. त्यामुळे सीबीआयची लाल दिव्याची गाडी त्याच्याकडे कायम असायची. आपण सीबीआय अधिकारी असल्‍याचे भासवण्यासाठी त्‍याने बनावट ओळखपत्रही बनवून घेतले होते. त्यानंतर या तोतयाने लाल दिव्याची गाडीचा वापर करून प्रसाद घोरपडे यांच्याप्रमाणेच अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सीबीआयने देखील तोतयाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT