सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ ः लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेली यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूम परिसरातील विद्युत वाहिनी खंडित केल्याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनाई असताना केलेल्या रस्ते खोदकामामुळे हा प्रकार घडला होता.
लोकसभा मतदान पार पडल्यानंतर कासारवडवली येथील स्ट्राँगरूममध्ये सर्व मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज आहे. तसेच पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत येथील विद्युतपुरवठा खंडित केला जाऊ नये, यासाठी महावितरणने ठाणे महापालिका, एमएमआरडीए यांच्यासह सर्वच यंत्रणांना घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा ते कावेसरपर्यंत खोदकाम करू नये, अशी सूचना केली होती. मात्र, असे असतानाही सोमवारी (ता. २०) या परिसरातील खोदकामामुळे विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणने तक्रार दाखल केल्यानंतर मे. लँडमार्क कॉर्पोरेशन प्रा. लि.विरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, याच ठेकेदाराने यापूर्वीदेखील अशाच प्रकारे विद्युतपुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.