Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: महिला डॉक्टरला प्रसूती रजा नाकारली; कोर्टाने फटकारले, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Chinmay Jagtap

Mumbai News: प्रसूती रजा हा महिलेचा अधिकार असताना रजा नाकारल्याने जरा तरी माणुसकी जिवंत ठेवा, असे मत नोंदवत प्रसूती रजेसाठी कर्मचाऱ्यांवर न्यायालयाचे दार ठोठावण्याची वेळ येता कामा नये, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला सुनावले.


पालिकेच्या भाभा रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉ. बोस प्रसूती रजेवर गेल्याने त्यांचा त्या काळातील पगार पालिकेने रोखून ठेवला. या प्रकरणी डॉ. बोस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांच्या याचिकेवर आज (ता.२१) सुटीकालीन न्यायालयाचे न्या. आरिफ डॉक्टर आणि न्या. सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी डॉ. बोस यांच्यावतीने अॅड. स्वराज जाधव यांनी पालिका प्रशासन मानवतावादी दृष्टिकोनातून वागण्याऐवजी कंत्राटी कर्मचारी असल्याचे सांगून प्रसूती रजेचा हक्क नाकारत याचिकाकर्त्यांना कामावरून बडतर्फ करण्याची भीती व्यक्त केली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाला मानवतावादी दृष्टिकोन ठेवून वागायला हवे, असे सुनावत याचिकाकर्त्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. तसेच एप्रिलचा पगार व इतर सर्व कायदेशीर हक्क तातडीने देण्याचे सांगत याचिकेवरील सुनावणी १२ जूनपर्यंत निश्चित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

Daund Crime: दौंडमध्ये रिलॅक्स इन लॉजवर छापा; सहा महिलांची सुटका, दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Flash Sale : ना ॲमेझॉन, ना फ्लिपकार्ट! 'या' ठिकाणी सुरुय बंपर सेल; 30 ते 50% पर्यंत डिस्काउंट, खरेदीसाठी लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT