मुंबई

‘त्या’ मच्छीमारांसाठी केंद्रीय धोरण ठरवा

CD

‘त्या’ मच्छीमारांसाठी केंद्रीय धोरण ठरवा
‍सुधीर मुनगंटीवार यांची पंतप्रधानांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः पाकिस्तानसह भारताच्या शेजारच्या देशांनी पकडून बंदी बनविलेल्या मच्छीमार बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याकरिता राष्ट्रीय धोरण व केंद्रीय अधिनियम निर्माण करावेत, अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना पत्रे लिहिली आहेत.
गुजरातच्या मासेमारी नौकांवर कार्यरत महाराष्ट्राच्या मच्छीमार बांधवांना पाकिस्तानने पकडले, तर त्यांना गुजरात सरकारने मदत करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून केली आहे. भारताला सुमारे साडेसात हजार किमीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे भारताच्या किनारी भागात मासेमारी हा अन्न व रोजगार देणारा एक प्रमुख व्यवसाय आहे. मच्छीमार बांधव सागरी मासेमारी करताना खोल समुद्रात जातात; मात्र अनेकदा सागरी हद्द न कळल्याने अनावधानाने शेजारच्या देशाच्या सागरी हद्दीत गेलेल्या मच्छीमार बांधवांना नौकेसह शेजारी देश बंदी बनवतात. अशा मच्छीमार बांधवांना त्यांच्या राज्यांकडून काही ना काही आर्थिक मदत दिली जाते; मात्र एका राज्यातील मच्छीमार /खलाशी दुसऱ्या राज्यातील मच्छीमार नौकेवर कार्यरत असतील तर अशा मच्छीमारांना/त्यांच्या कुटुंबीयांना त्या राज्याकडून आणि स्वतःच्या मूळ राज्याकडूनही आर्थिक मदत मिळत नाही. त्याबाबत प्रत्येक राज्याच्या शासन आदेशात काही ना काही कमतरता आहेत. म्हणून याबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण असावे आणि केंद्रीय अधिनियमांतर्गत अशा शेजारी देशांच्या बंदीवासात अडकलेल्या मच्छीमार बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT