मुंबई

भिवंडीत अपक्ष तुतारीला २४ हजार मतांचे दान

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : लोकसभा निवडणुकीत अनेक लढती या चुरशीच्या झाल्या आहेत. या निवडणुकीत अनेक ठिकाणी नावात साधर्म्य असलेले उमेदवार उभे ठाकले होते. तर, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले; मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेत न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या कांचन विनायक वखारे या अपक्ष महिला उमेदवाराला तब्बल २४ हजार ६०७ मते मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अनेक मतदारसंघात नावात साधर्म्य असलेले उमेदवार उभे ठाकले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या नावात साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार कपिल जयहिंद पाटील तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचे नामसाधर्म्य असलेले उमेदवार सुरेश सीताराम म्हात्रे हे उभे ठाकले होते. असे असताना दुसरीकडे सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह होते. तर, अपक्ष उमेदवारांसाठी राखीव असलेल्या चिन्हांमध्ये एक विदेशी वाद्य निवडणूक चिन्ह म्हणून ठेवले होते. ज्याचे मराठी भाषांतर तुतारी असे लिहिण्यात आले होते. याबाबत सुरुवातीपासूनच अनेकांनी शंका उपस्थित केली होती. तुतारीमुळे भिवंडी लोकसभेच्या रिंगणात न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या कांचन विनायक वखारे या अपक्ष महिला उमेदवाराला तब्बल २४ हजार ६०७ मते मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT