मुंबई

डेंग्‍यू, मलेरियावर जपानी तेलाचा उतारा

CD

डेंगी, मलेरियावर जपानी तेलाचा उतारा
पालिकेने आयात केले रसायन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पावसाळा सुरू होताच मुंबईत पावसाळ्यातील आजारांचा प्रादुर्भावही सुरू होतो, विशेषत: मलेरिया आणि डेंगी या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने जपानमधून खास रसायन आयात केले आहे. या रसायनाच्या झालेल्या चाचणीत महापालिकेला अवघ्या १५ मिनिटांत डास मृत झाल्याचे आढळून आले आहे.
पावसाळा सुरू झाला की, मलेरिया आणि डेंगीचा प्रादुर्भाव वाढू लागतो. गेल्यावर्षी मुंबईत मलेरियाचे सात हजार, तर डेंगीचे साडेपाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. यंदा अवघ्या सहा महिन्यांत मलेरियाचे दोन हजार ४००, तर डेंगीचे ३८१ रुग्ण आढळले आहेत. मलेरिया आणि डेंगीच्या प्रतिबंधासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने या आजारांचे वाहक असलेल्या डासांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सायफेनोथ्रिन नावाचे रसायन महापालिकेने जपानच्या सुमितोमो केमिकल कंपनीकडून आयात केले आहे.

४५०० लिटर रसायन आयात -
महापालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे साडेचार हजार लिटर रसायन आयात करण्यात आले आहे. ते सुमारे तीन ते चार महिने चालणार आहे. या रसायनाची चाचणी गेल्या आठवड्यात करण्यात आली, जी डासांना मारण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरली.

या रसायनाच्या माध्यमातून मलेरिया-डेंगी आजाराचा प्रसार रोखता येईल. एखाद्या व्यक्तीचे रक्त शोषल्यानंतर डास एकाच खोलीत एकाच ठिकाणी थांबतात, कारण रक्त शोषल्याने डासांचे शरीर जड होते. अशा परिस्थितीत हे डास बंद खोलीत धुक्यामुळे मरतात, असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख चेतन चौबळ म्‍हणाले.

‘एनवीबीडीसीपी’ची मान्यता
या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटना आणि एनवीबीडीसीपीची टीम मुंबईत होती. राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (एनवीबीडीसीपीचे)नेदेखील ‘सायफेनोथ्रिन’ला मान्यता दिली आहे. शहरात मलेरिया व डेंगीचे सातत्याने वाढत असलेले रुग्ण पाहता कृती आराखड्याला बळकटी देण्याचे काम सुरू आहे.

पावसाळ्यात डेंगी आणि मलेरियाचा सामना करण्यासाठी विशेष पद्धतीचा अवलंब केला जाईल, ज्यामध्ये रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या विशिष्ट वॉर्डांना लक्ष्य केले जाईल.
डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

Samsung Discount Offer : चक्क 24 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट; सॅमसंगच्या 'या' प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर सूट

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT