मुंबई

बदलापूर-पाईपलाईन रोडला नदीचे स्वरूप

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे व सफाई केलेले नाले रस्त्याच्या बाजूला नसल्याने पावसाळ्यात बदलापूर-काटई पाईपलाईन रोडवर प्रचंड प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कडकडीत ऊन पडत आहे. तरीही या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे मार्गावर कोंडी होत आहे. याचा त्रास चाकरमान्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांनादेखील सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर मार्गावरून अवजड वाहतूक होत असल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीमुळे एमआयडीसी याकडे लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बदलापूर-काटई पाईपलाईन रोडचे सिमेंट- काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता म्हाडा खोणी वसाहतीच्या पुढे काही अंतरावर रस्ताच गायब होत आहे. डावलपाडा गावाजवळ पाणी साचले आहे. अंबरनाथवरून कल्याण-शीळ रोडला येण्याच्या मार्गिकेवर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यातच डोंगरावरून वाहत येणारे पावसाचे पाणी या मार्गावर साचत आहे. या मार्गावर आधीच खड्डे आहेत. त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.

वाहनांचे नुकसान
रस्त्यात पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावून येथे कोंडीची समस्या निर्माण होत आहे. दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने प्रवास करत असल्याने अंबरनाथ दिशेने जाणाऱ्या मार्गावरदेखील कोंडी होत आहे. कधी कधी वाहने खड्ड्यात आदळून वाहने मध्येच बंददेखील पडत आहेत.

कामगारांना लेटमार्क
अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, वांगणी, तसेच अंबरनाथ एमआयडीसीत कामास जाणारा कामगार वर्ग या मार्गावरून दररोज प्रवास करतो. जोरदार पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी या मार्गावर पाणी साचते. मात्र, सध्या तेवढ्या प्रमाणात पाणी नसून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. ऊन- पावसाचा खेळ सुरू आहे. कडकडीत ऊन पडलेले असताना हा मार्ग मात्र कायम पाण्याखाली गेला असल्याची परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT