मुंबई

गृहप्रकल्पाच्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : पावसाळ्यात डेंगी, मलेरियासारखे साथीचे आजार पसरत असतात. त्या‍ पार्श्वभूमीवर गृहप्रकल्पांची उभारणी करताना प्रकल्पाच्या ठिकाणी जलजन्य आजार, मलेरिया, डेंगी डासांची निर्मिती होणार नाही, अशा प्रतिबंधक उपाययोजना करण्याची सूचना पालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती. या उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या; तसेच बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या आढळून आल्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील १२ विकासकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर पालिका हद्दीत साथरोग पसरवणाऱ्या डासांची निर्मिती होणार नाही. या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार घनकचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. १५-२० दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या साथीच्या आजाराने नागरिक हैराण आहेत. शहरातील डॉक्टरांच्या क्लिनिकवर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागातही ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
शहरात साथीचे आजार पसरू नये, यासाठी जंतूनाशक फवारणी, शहराची स्वच्छता केली जात आहे. त्याचबरोबर पालिका हद्दीत गृहनिर्माण प्रकल्प उभारणाऱ्या विकासकांना काही सूचना, आदेश देण्यात आलेले आहेत. विकासकांनी स्वतःहून आपल्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाणी साठवणीसाठी तयार केलेले खड्डे, इमारतीवर स्लॅब टाकल्यानंतर भक्कमपणासाठी त्यात पाणी साठवणे, काँक्रीटचे चौकोन, इमारतीजवळील पाण्याचे पिंप या ठिकाणी मलेरिया, डेंगीच्या डासांची निर्मिती होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्याची काळजी म्हणून दर सात दिवसांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी होणे आवश्यक आहे, अशा सूचना दिल्या आहेत.
जून ते ऑक्टोबर या कालावधीत डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक काळ आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे हिवताप, डेंगी ताप, मेंदूज्वर यांसारखे रोग पसरण्याची शक्यता असते. वेळीच काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक साथ रोग नियंत्रण कृती आराखड्याप्रमाणे उपाययोजनांची कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार केडीएमसी कार्यक्षेत्रांतर्गत नव्याने विकसित होत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. या वेळी काही प्रकल्पांवर साठवलेल्या पाण्यामध्ये डास अळी आढळून आल्या आहेत. यामध्ये बी. आर. होमर्स, योगीराज शेळके, ओमकार चिन्मय पाटील, राजेंद्र परांजपे, रवि शुभंकर सोसायटी, श्रीकृष्ण मराठे, सौरभ उगावडे, संदीप गुडे, अभय कामत, सचिन कटके, नीलपदम डेव्हलपर्स यांना पालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मजुरांच्या आरोग्याला धोका
नोटिसा बजावलेल्या विकासकांच्या गृहप्रकल्पाची पाहणी केल्यावर तेथे साठवण केलेल्या पाण्यात मलेरिया, डेंगी डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. हे डास तेथील मजुरांना चावले, तर साथीचा आजार पसरण्याची भीती आहे. तसेच मजुरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे १२ विकासकांना गृहप्रकल्पाच्या ठिकाणी डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. या कामात संबंधित विकासकांनी हलगर्जीपणा केला, तर त्याची माहिती आयुक्त, उपायुक्त यांसह, नगररचना विभागाला देऊन संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करण्याची शिफारस केली जाणार आहे. या विकासकांना बांधकामाच्या ठिकाणी धूर फवारणी, औषध, जंतुनाशक फवारणी नियमित करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT