मुंबई

उल्हासनगरात दारूची झिंग चढलेल्या बर्थडे बॉय मित्राचा मित्रांकडूनच खून,

CD

चौथ्या मजल्यावरून फेकून मित्राची हत्या
बर्थ-डे पार्टी जिवावर; उल्हासनगरात त्रिकुटाला अटक

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर)ः वाढदिवस साजरा करताना दारूची झिंग चढलेल्या बर्थ-डे बॉयने मित्राकडे आणखी दारू मागितल्याने झालेल्या वादातून तीन मित्रांनी मिळून त्याला चौथ्या मजल्याच्या खिडकीतून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र चौकशीअंती हत्येचा उलगडा झाला असून त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.
चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या कार्तिक वायाळ (वय २३) याचा २७ जूनला वाढदिवस होता. प्रथम एका ठिकाणी सेलिब्रेशन झाल्यावर आर्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपर्यंत पार्टी सुरू राहिली. दारूची झिंग चढलेल्या कार्तिकने पुन्हा दारूची मागणी केली. त्यावर आपण खूप एन्जॉय केले आहे, आता दारू नको, असे कार्तिकला समजावण्यात आले; पण राग आलेल्या बर्थ-डे बॉय कार्तिकने नीलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नीलेश क्षीरसागर, सागर काळे, धीरज यादव या तिघांनी कार्तिकला जबर मारहाण केली आणि चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकून दिले. त्यात कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सखोल तपास केला असता कार्तिकची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.
...
दोन दिवसांत उलगडा
कार्तिकचे वडील नामदेव वायाळ यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांच्याविरोधात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या टीमने या घटनेचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत केला. पुढील तपास उपनिरीक्षक टी. एन. खळडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT