मुंबई

मुलुंडच्या रस्ता चुकलेल्या ट्रेकर्सची पोलिसांनी केली सुटका

CD

मुलुंडच्या रस्ता चुकलेल्या ट्रेकर्सची पोलिसांनी केली सुटका

मुलुंड, ता. ३ (बातमीदार) : माणिकगड येथे ट्रेकिंगसाठी निघालेले मुलुंडमधील ट्रेकर्स रस्ता चुकून हरवले होते. यामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. ट्रेकर्स वाट चुकल्यानंतर रायगडमधील रसायनी पोलिसांनी रविवारी संध्याकाळी त्यांची सुखरूपपणे सुटका केली.
ट्रेकर्स करणाऱ्यांचा २६ जणांचा ग्रुप होता; मात्र पाच ट्रेकर्स त्यांच्या कॅब ड्रायव्हरच्या सल्ल्यामुळे चुकीच्या ठिकाणी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ट्रेकिंगला सुरुवात झाली होती. यामध्ये श्रेया दंड (वय २०), चिराग शहा (२०) आणि हृदय ठक्कर (१९) हे महाविद्यालयीन विद्यार्थी होते; तर किरण खोना आणि यशपाल मोमाया हे कॉर्पोरेट इंजिनिअर म्हणून काम करतात. ट्रेकिंग करणाऱ्या २६ जणांनी पनवेलहून चार कॅब भाड्याने घेऊन ते वडगावमध्ये पोहोचले. नंतर २१ ट्रेकर्सनी वाशिवली ठाकूरवाडीतून माणिकगडचा यशस्वी ट्रेक केला, मात्र पाच ट्रेकर्स दुपारी दीड वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत डोंगराळ जंगलातून ट्रेक करत वडगाव गावापासून तीनशे फुटावर असलेल्या दरीसारख्या धोकादायक ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांची वाट चुकल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवर आपले लोकेशन शेअर केले आणि मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर खालापूर पोलिसांनी रसायनी पोलिसांना निरोप देऊन ट्रेकर्सचा शोध सुरू केला. यावेळी मदतीसाठी रसायनीचे पोलिस निरीक्षक संजय बांगर यांनी तीन हवालदार आणि वाशिवलीतील रहिवासी यांना मदतीसाठी पाठवले. दुपारी रस्ता चुकलेल्या ट्रेकर्सपासून बचाव पथक १०० मीटरवर होते; मात्र डोंगराचा अडथळा असल्यामुळे संपर्क होत नव्हता. त्यानंतर बचाव पथकाचा आवाज ऐकून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी टी-शर्ट फिरवत आरडाओरडा केल्यानंतर पुढील मार्ग शोधण्यासाठी पथकाने त्यांना मार्गदर्शन केले व त्यांची जंगलातून नंतर सुटका करण्यात आली. सुखरूप सुटका केल्याबद्दल सर्व ट्रेकर्सनी पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: हपकिनच्या कामकाजाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तुकाराम मुंडे यांच्याकडेच पदभार ठेवा: वळसे पाटील यांची विधिमंडळात मागणी

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT