मुंबई

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेच्या काही तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. ७) मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मेल- एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.
--------------------------------------------
मध्य रेल्वे -
कुठे- ठाणे- दिवा पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर
कधी- सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत
-------------------------------------------
परिणाम -
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. अप जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील; तर मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
-------------------------------
हार्बर रेल्वे-
कुठे -कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
-------------------------------
परिणाम -
ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा धावणार आहे.
---------------------------------
या गाड्यांना होणार विलंब -
ट्रेन क्रमांक १२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२१६० चेन्नई - सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर - सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१६८ बनारस - एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२३२१ हावडा -सीएसएमटी मेल, ट्रेन क्रमांक १२८१२ हटिया - एलटीटी, ट्रेन क्रमांक ११०१४ कोईम्बतूर - एलटीटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१४२ पाटलीपुत्र - एलटीटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२२९४ प्रयागराज - एलटीटी दुरंतो एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०८० गोरखपूर - एलटीटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०६० छपरा -एलटीटी एक्स्प्रेस १० ते १५ मिनिटे विलंबाने पोहोचणार आहेत.
--------------------------
मेमू सेवा रद्द -
मेमू क्रमांक ०१३३९ वसई रोड-दिवा- वसई रोड मेमू कोपरपर्यंत धावेल व कोपर ते दिवा स्थानकादरम्यान रद्द राहील. मेमू क्रमांक ०१३४१ वसई रोड-दिवा-वसई रोड मेमू कोपरपर्यंत धावेल व कोपर ते दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहणार आहे.
-------------------------
पश्चिम रेल्वेचा आज रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. ६) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT