मुंबई

शालेय योग स्पर्धा; पूर्ण प्रज्ञा हायस्कूलची छाप

CD

शालेय योग स्पर्धा; पूर्ण प्रज्ञा हायस्कूलची छाप
मुंबई : आंतरशालेय योग स्पर्धेत दहिसरच्या पूर्ण प्रज्ञा हायस्कूलच्या मुग्धा मोरे हिने १०-१२ वयोगटांत शानदार कामगिरी करताना जेतेपद पटकावले. त्याचवेळी मुलांच्या १२-१४ वयोगटांत माधवेश लोंकर याने पहिले उत्तेजनार्थ पुरस्कारावर नाव कोरले. मालाड येथील ज्योत्स्ना धीरजलाल तलकचंद सेकंडरी स्कूलच्या (जेडीटी) वतीने आयोजित झालेल्या या स्पर्धेत एकूण १५ शाळेतील योगपटूंनी सहभाग घेतला होता. १०-१२ वयोगटांच्या ब गटामध्ये खेळाडूंना वीरभद्रासन-३, हनुमानासन, पूर्ण भुजांगासन, परिवृत्त पार्श्वकोनासन आणि पद्म बकासन हे आसन सादर करणे अनिवार्य होते. यामध्ये सर्व सहभागी खेळाडूंनी शानदार सादरीकरण केले; परंतु केवळ मुग्धाकडून पद्म बकासनचे अचूक सादरीकरण झाले आणि या जोरावर तिने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुलांच्या १२-१४ वयोगटांच्या क गटामध्ये त्रिकोणासन, अर्धबंध पद्म पश्चिमोत्तासन, धनुरासन, अर्ध मत्स्येंद्रासन आणि हलासन ही आसने सादर करणे अनिवार्य होते. अटीतटीच्या झालेल्या या गटामध्ये मोक्याच्या वेळी झालेल्या माफक चुकांमुळे माधवेशला पहिल्या उत्तेजनार्थ पुरस्कारावर समाधान मानावे लागले. पूर्णप्रज्ञा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रचना शर्मा आणि योग शिक्षिका हेमवंता सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुग्धा व माधवेश यांनी यशस्वी कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT