मुंबई

गुरचरण जमिनींवरील हाॅटेल्स, गाळे जमीनदोस्त

CD

टिटवाळा ता. ९ (बातमीदार) : कल्याण-मुरबाड रस्त्यावरील गोवेली येथील गुरचरण जमिनींवर उभारलेले बेकायदा हाॅटेल्स, व्यापारी गाळे, अशी एकूण २१ हून अधिक बेकायदा बांधकामे महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. ६) जेसीबीच्या आणि तोडकाम पथकाच्या सहाय्याने भुईसपाट केली. बांंधकामधारकांना महसूल विभागाने पूर्वसूचना नोटिसा दिल्या होत्या. मुख्य वर्दळीचे रस्ते अडवून ही बेकायदा बांधकामे केली होती. गुरचरण जमिनीवरील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात राज्य सरकारला दिले आहेत.

राज्य सरकारच्या आदेशावरून ही कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याणचे तहसीलदार सचीन शेजाळ यांना गोवेली येथील गुरचरण जमिनीवरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे तहसीलदार शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, म्हारळच्या मंडळ अधिकारी प्रीती घुडे, नडगावच्या मंडळ अधिकारी दर्शना भावे, टिटवाळ्याचे चेतन पष्टे, टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरचरण जमिनीवरील २१ व्यापारी गाळे, हाॅटेल्स जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकण्यात आली.

कल्याण तालुक्यात गुरचरण जमिनीवर जेथे व्यापारी गाळे, हाॅटेल्स आहेत, अशी ठिकाणे निश्चित करून त्यांना नोटिसा देऊन ती बेकायदा बांधकामे तोडण्यात येणार आहेत.
सचीन शेजाळ, तहसीलदार, कल्याण.


फोटो ओळ
गोवेली येथील गुरचरण जमिनीवरील अनधिकृत बांधकामे तोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT