मुंबई

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात गळती

CD

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात गळती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे जिल्हा परिषदेचे वागळे इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात इमारतीच्या तळमजल्यावरील पाणीपुरवठा विभागातील भिंतीतून पावसाचे पाणी झिरपत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाणी सर्वत्र पसरत असल्याने या ठिकाणी कर्मचाऱ्यांना बसणे कठीण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठाणे जिल्हा परिषदेची जुनी इमारत मुख्य बाजारपेठेत आहे. जुनी इमारत धोकादायक झाल्याने ती इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. या नव्या इमारतीच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यानुसार वागळे इस्टेट येथील तळ अधिक दोन मजली इमारतीत जिल्हा परिषदेचे स्थलांतर करण्यात आले. त्यात ठाणे रेल्वे स्थानकापासून कार्यालय लांब असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठण्यास आधिच दमछाक होत आहे. अशातच आता पहिल्याच पावसात या इमारतीत होत असलेल्या गळतीमुळे कर्मचारी हैराण झाल्याचे चित्र आहे.

इमारतीच्या तळमजल्यावर समाज कल्याण, आरोग्य आणि ग्रामीण पाणीपुरवठा असे तीन ते चार विभाग आहेत. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा विभाग आहे, तेथे बाहेरच्या बाजूला पार्किंगची जागा आहे. त्या जागेच्या येथे असलेल्या शेडमधून हे पावसाचे पाणी आतील बाजूस झिरपत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाऊस सुरू असताना या पाण्याचा प्रवाह सर्वाधिक असल्यामुळे या विभागात पाणीच पाणी साचते. याच पाण्यात कर्मचाऱ्यांना बसून काम करावे लागत आहे. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरत असते. त्यात पावसात पाणीपुरवठा विभागात होत असलेल्या पाणीगळतीमुळे कर्मचारीवर्ग नाराजी व्यक्त करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT