मुंबई

ठाणे थोडक्यात

CD

प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचाऱ्यांचे उपोषण
अंबरनाथ (बातमीदार) : नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि सध्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत असलेल्या युनियनचे अध्यक्ष मनोहर झुंज आणि सचिव लक्ष्मण अय्यकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने महामंडळाच्या स्वच्छता विभागात २५ वर्षे सेवा केलेल्या आणि नियुक्त केलेल्या घरांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे दिली आहेत; मात्र अंबरनाथ नगरपालिका प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून घर भाड्याच्या स्वरूपात सात हजार रुपये आणि सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून महिन्याला दहा हजार रुपये भाडे स्वीकारत आहे. या कर्मचाऱ्यांनी सफाई कामगारांची घरे त्यांच्या नावावर करून देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.
......................
कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
भिवंडी (बातमीदार) : मुंबई-नाशिक वाहिनीवर रस्ता ओलांडताना एका कारचालकाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेनंतर कारचालक फरार झाला आहे. आसबअली मोहीद्दीन मापारी (५७) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात १८ जून रोजी रात्रीच्या सुमारास आसबअली हे मुंबई-नाशिक वाहिनी येथील भूमी वर्ल्डसमोरील रस्ता ओलांडत होते. त्यावेळी अज्ञात कारचालकाने आसबअली यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, त्यांना लाईफलाईन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी १९ जून रोजी मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले; मात्र २३ जून रोजी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे. तर या अपघाताची नोंद कोनगाव पोलिस ठाण्यात केली असून आसबअली यांची मुलगी आलीया मापारी हिच्या फिर्यादीवरून ७ जुलैला अज्ञात ओला चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
...........................
शिवळे महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा
मुरबाड (बातमीदार) : जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड संचालित शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे या महाविद्यालयाचा ३५वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी (ता. १०) पार पडला. महाविद्यालयाची स्थापना १० जुलै १९८९ मध्ये झाली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. जी. आर. विशे होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाची स्थापना ते जडणघडण आणि वाटचाल, तसेच बदललेले शैक्षणिक धोरण आणि पूर्वीचे उच्च शिक्षण धोरण याबद्दल त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. पी. डी. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी जनसेवा शिक्षण मंडळ संस्थेच्या व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख व लेखाजोखा आपल्या मार्गदर्शनातून मांडला. तसेच, वरिष्ठ लिपिक अनिल मोहपे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला. प्रारंभी वाणिज्य विभागाचे डॉ. एस. एस. पवार यांनी आयक्यूएसीचा मास्टर प्लॅनचे वाचन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख प्राध्यापक व कार्यालयीन अधीक्षक साधना मोरे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप चपटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. एम. घुटे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT